कंगनाच्या वक्तव्याची चर्चा होणार नाही अस कधी होत नाही. अशीच चर्चा पुन्हा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी पद्मावती चित्रपटात पद्मावती ची भूमिका केल्यामुळे दीपिका ला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. तर काहींनी दीपिका ला मारणार्यास बक्षीस सुद्धा जाहीर केले. त्यानंतर जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी ह्यांनी दीपिकाच्या समर्थनार्थ दीपिका बचाव आंदोलन सुरु केले. ह्या आंदोलनासाठी बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींनी सह्या करून पाठींबा दर्शवला होता. मात्र ह्या वर कंगना ने सही करण्यास नकार दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. म्हणजे दीपिका ला कंगनाचा पाठींबा नाही अस अर्थ काढण्यास सुरवात झाली. ह्यावर अखेर कंगना ने उत्तर दिले आहे ती म्हणाली कि माझा दीपिका ला पाठींबा आहे परंतु शबाना आझमी ह्यांच्या डावे उजवे राजकारणापासून मला लांब राहायचं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews